विस्डनने घोषित केली तिन्ही फॉरमॅट खेळणारी बेस्ट टीम, पहा कोणाला मिळाली संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्याच्या क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक असे दिग्गज क्रिकेटपटू आहेत कि ते काही क्षणांमध्ये मॅचचे चित्र पालटू शकतात, पण असे खूप कमी खेळाडू आहेत जे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे काम करू शकतील. विस्डनने नुकतीच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये भारताच्या 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यामध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यामध्ये पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही आहे. विस्डनच्या ऑल टाईम प्लेयिंग इलेव्हनमध्ये भारताकडून रोहित शर्मा,विराट कोहली, ऑलराऊंडर म्हणून रविंद्र जडेजा,फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह याचा समावेश करण्यात आला आहे.

विस्डनच्या या यादीत ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरला,न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट आणि केन विलियमसन,इंग्लंडकडून जॉस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश करण्यात आला आहे. या टीममध्ये अफगाणिस्तानच्या राशीद खानचाही समावेश करण्यात आला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमला या टीममध्ये जागा देण्यात आली नाही. विस्डनने या टीमचे कर्णधारपद विराट कोहलीला दिले आहे.

विस्डनची तिन्ही फॉरमॅटसाठीची टीम
डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केन विलियमसन, बेन स्टोक्स, जॉस बटलर, रविंद्र जडेजा, राशिद खान, जोफ्रा आर्चर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह