चिंताजनक! चीन मध्ये कोरोनारुग्णांच्या संख्येत पुन्हा होतेय वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या ४६ नवीन प्रकरणांपैकी १० प्रकरणे स्थानिक संसर्गाशी संबंधित आहेत. आरोग्य तज्ञांनी परदेशातून येणाऱ्या नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, येत्या काळात रशियाच्या पूर्वेकडील सीमेवर असलेले शहर दुसरे वुहान होऊ शकेल. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) बुधवारी सांगितले की या ४६ नव्या घटनांमध्ये चीनमध्ये परतलेले बहुतेक नागरिक परदेशातील आहेत. यासह, नुकत्याच समोर आलेल्या नवीन प्रकरणांची संख्या मंगळवारी वाढून १,५०० झाली आहे. यामध्ये १० स्थानिक लोकांना संसर्ग झालेला आहे.

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की चीन-रशियन सीमेवरील सुफेन हे शहर आता नवे वुहान बनत आहे कारण इथल्या रशियामधील बहुतेक लोकांना कोविड -१९ चा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. एनएचसीने म्हटले आहे की, मंगळवारी कोणत्याही लक्षणांविना ५७ लोक संसर्गित झालेत. देशात अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या १,०२३ वर पोहोचली आहे.

Why you need to sustain your business in China during a crisis ...

हे असे लोक आहेत ज्यांच्यात ताप, खोकला, घशात दुखणे अशी कोणतीही लक्षणे दिसली नव्हती, परंतु तरीही त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले. हे लोक संक्रमित आहेत आणि त्यामुळे इतरांनादेखील त्यांच्याकडून संसर्ग होऊ शकतो. दरम्यान, हुबेई प्रांतात या विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी मृतांची एकूण संख्या ३,३४२ वर पोचली आहे.

मंगळवारपर्यंत देशात एकूण ८२,२९५ रुग्णांना संसर्गाची पुष्टी झाल्याची घटना घडली. यात प्राण गमावलेल्या ३,३४२ तर उपचार सुरू असलेल्या १,९१,१३७ आणि बरे झालेल्या ७७,८१६ लोकांचा समावेश आहे. मंगळवारी, हाँगकाँगमध्ये एकूण १,०१२ लोकांना संसर्ग झाल्याची घटना घडली असून त्यात चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिली. त्याच वेळी मकाऊमध्ये ४५ आणि तैवानमध्ये ३९३ प्रकरणे नोंदली गेली, ज्यात ६ लोकांचा जीव गेला आहे.

Coronavirus live updates: US confirms 15th case, Global cases soar ...

कोरोनाने आतापर्यंत जगातील २० लाख लोकांना संक्रमित केले आहे, तर १ लाख २० हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. मंगळवारी जगभरात या संसर्गाची सुमारे ७५००० नवीन प्रकरणे नोंदली गेली. भारतातही वाढत्या प्रकरणांमुळे सरकारने लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment