मुंबई : हॅलो महाराष्ट्र – न्यूझीलंडच्या टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमने घरच्या मैदानातील सगळ्या सीरिज जिंकल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडने मायदेशात भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2-2 मॅच जिंकल्या आहेत. यावरून असे दिसते कि न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणे कठीण आहे.
पण भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने एक जागितक टीमची निवड केली आहे. हि टीम न्यूझीलंडला घरच्या मैदानात पराभूत करू शकते. या टीममध्ये विराट कोहलीला स्थान देण्यात आले नाही. आकाश चोप्राने त्याच्या वर्ल्ड इलेव्हनमध्ये भारताच्या तीन खेळाडूंचा, ऑस्ट्रेलियाच्या चार, इंग्लंडच्या तीन खेळाडूंचा तर श्रीलंकेच्या एका खेळाडूचा समावेश केला आहे.
आकाश चोप्राची टीम
रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लाबुशेन, जो रूट (कर्णधार), स्टीव स्मिथ, बेन स्टोक्स, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, पॅट कमिंस, स्टुअर्ट ब्रॉड, जॉश हेजलवूड