हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्तीय क्षेत्राशी संबंधित खाजगी येस बँकेने १५ हजार कोटी रुपयांची रक्कम फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ)च्या माध्यमातून वाढवण्याची घोषणा केली आहे. १५ जुलै पासून ही सेवा सुरु होणार असून १७ जुलै ला बंद होणार आहे. यासाठी आधार दर १२ रु प्रति शेयर ठरविण्यात आला आहे. एफपीओ साठी कमाल १३ रु प्रति शेयर असणार आहे. याप्रमाणे २रु च्या शेयरसाठी ६पट अधिक आणि कॅप प्राईज ६.५ पट अधिक ठेवण्यात आली आहे. बोली लावणारे कमीत कमी १ हजार शेयरची बोली लावू शकतील. यानंतर हे हजार मल्टिपल मध्ये वाढू शकतात. बँकेने पात्र कर्मचाऱ्यांसाठी पात्र कर्मचाऱ्यांसाठी १ रु प्रति शेयर अशी विशेष सूटही दिली आहे.
बँकेचे चिफ एक्सीक्युटीव्ह आणि मॅनेजिंग डायरेक्टर प्रशांत कुमार यांनी आज सांगितले की, एफपीओ कडून येणारी १५ हजार कोटी रक्कम बँकेच्या दोन वर्षांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी असेल. किंमत कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. एसबीआय ने मार्च मध्ये येस बँकेला संकटातून सावरले होते. बँक शुक्रवारी आपले शेयर बंद भावाच्या जवळपास अर्ध्या किंमतीला शेयर विकत आहे. बँकेत एसबीआय ची ४९% भागीदारी आहे आणि सेंट्रल बोर्डाने येस बँकेला एफपीओ मध्ये कमाल १,७६० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे.
कुमार यांनी सांगितले की, बँकेत कॉर्पोरेट गव्हर्नन्स चे मुद्दे आणि फसलेल्या परिसंपत्तीची ओळख करण्यात आली आहे. तसेच नवीन प्रबंधनात मागच्या दोन तिमाहीत याची तरतूद करण्यात आली होती. त्यांनी कोविड-१९ मुळे १% रकमेची तरतूद करावी लागू शकते हे ही मान्य केले आहे. बँक आपल्या पोर्टपोलियो मध्ये कार्पोरेट कर्ज घटवून ४०% करण्याचा प्रयत्न करते आहे जे ५५% आहे. असेही त्यांनी सांगितले. एफपीओ च्या गुंतवणूकदारांची नावे मंगळवारी जाहीर केली जातील असे त्यांनी सांगितले. एलआयसी आणि प्रायव्हेट इक्विटी फर्म यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र त्यांनी गुंतवणूकदारांची नावे घोषित करण्यात नकार दिला.