योगी आदित्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला. हा मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

योगी सरकारने डायल ११२ या सेवे अंतर्गत पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य सेवांशी संबंधित आकस्मिक सेवांना समाविष्ट केले गेले आहे. ही एक आपत्कालीन सेवा आहे. हा नंबर डायल केल्यावर पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य यांसारख्या सेवा अगदी काही वेळातच पुरविल्या जातात. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात योगी सरकार या क्रमांकावरून एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चालवत आहे, ज्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याच्या धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. पोलिस आता त्या नंबरचा शोध घेण्यात गुंतले आहेत.

गोमती नगरचे निरीक्षक डीके सिंह यांनी सांगितले की डायल ११२ मुख्यालयातून हा संदेश मागविण्यात आला आहे. संदेश पाठविण्यासाठी वापरल्या गेलेल्या क्रमांकाची तपासणी सुरू केली गेली आहे. लवकरच त्या नंबरचे लोकेशन शोधून काढले जाईल. लखनौच्या गोमती नगर पोलिस ठाण्यात मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या या अज्ञात इसमाविरुद्ध कलम ५०५० वन B, ६०६ आणि ७०७ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.