मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यापासून विराट कोहलीच्या कॅप्टनसीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे अन्य देशांप्रमाणे भारतामध्येही लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटसाठी वेगळा कॅप्टन असावा तसेच रोहित शर्माने या टीमचे नेतृत्त्व करावे अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने मोठ वक्तव्य केले आहे.
सुरेश रैनाने विराटबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ‘माझ्या मते तो नंबर 1 कॅप्टन आहे. त्याने खूप काही मिळवले आहे, हे त्याचा रेकॉर्ड सांगतो, तो जगातील नंबर 1 बॅट्समन आहे. तुम्ही आयसीसी ट्रॉफीबद्दल बोलता पण त्याने अजून एकही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही.त्याला आणखी थोडा वेळ द्यायला हवा. आयसीसी स्पर्धा सलग होत आहेत. या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणे सोपे नसते.तुम्ही काही गोष्टी मिस करू शकता.असे देखील रैना म्हणाला.
का झाला फायनलमध्ये पराभव?
रैनाने यावेळी न्यूझीलंड विरुद्ध फायनलमध्ये पराभव का झाला याचे कारण देखील सांगितले आहे. ‘तेथील परिस्थितीमुळे हा पराभव झाला असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. मात्र माझ्या मते आपल्या बॅटींगमध्ये काही तरी कमतरता राहिली. मोठ्या बॅट्समननी जबाबदारी घेऊन पार्टनरशिप करायला हवी होती. टीम इंडिया चोकर्स नाही. त्यांनी आजवर दोन 50 ओव्हर्सचे आणि एक 20 ओव्हर्सचा वर्ल्ड कप जिंकला आहे. येत्या 12 ते 16 महिन्यांमध्ये आणखी एक आयसीसी ट्रॉफी भारतामध्ये येईल अशी भविष्यवाणीसुद्धा सुरेश रैनाने केली आहे.