जालन्यातील तरुणाचा करुण अंत! मित्रांसोबतची ‘ती’ सेल्फी बेतली जीवावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये सेल्फी घेणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मित्रांबरोबर सेल्फी घेण्याच्या नादात तो खदानीत पडला आणि त्यातच त्याचा बुडून (drowned) मृत्यू झाला. जालना तालुक्यातील खरपुडी परिसरात हि दुर्दैवी घटना घडली आहे. अथर्व गिरी असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो खरपुडी येथील कृषी विद्यालयात शिक्षण घेत होता. या घटनेमुळे अथर्वच्या घरच्यांना धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास तीन मित्र आणि दोन मैत्रिणींसोबत अथर्व हा फोटोशूट करण्यासाठी खदानीच्या काठावर गेला होता. यावेळी आपल्या मित्रांबरोबर सेल्फी काढताना त्याच्या हातातून त्याचा मोबाईल सटकला आणि तो खदानीत पडला. यानंतर अथर्व खदानीमधून आपला मोबाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. यादरम्यान मोबाईल बाहेर काढतअसताना अचानक त्याचा तोल गेला आणि खदानीत पडला. यानंतर त्याचा खदानीत बुडून (drowned) मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच जालना पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी अथर्वचा मृतदेह (drowned) बाहेर काढून त्याच्या कुटुंबियांच्या हवाली केला. तरुण पोराचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अथर्वच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…