मुंबई : हॅलो महाराष्ट्र – युझवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. युझवेंद्र चहल हा आरसीबीच्या यशस्वी बॉलरपैकी एक आहे. पण युझवेंद्र चहलने मात्र आपल्याला धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
युझवेंद्र चहलने आरसीबी नाही तर चेन्नईकडून आपल्याला खेळायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहल 2014 पासून तो बँगलोरकडून खेळत आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने 7 मॅचमध्ये 8.26 च्या इकोनॉमी रेटने 4 विकेट घेतल्या होत्या. कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आली होती.
आयपीएलचे उरलेले सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये होणार आहे. त्यामुळे चहलला आपली कामगिरी सुधारण्यासाठी चांगला वेळ मिळणार आहे. तसेच यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी चहलची कामगिरी टीम इंडियासाठी महत्त्वाची असणार आहे. आतापर्यंतच्या आयपीएल करियरमध्ये चहलने 106 सामन्यांमध्ये 7.70 च्या इकोनॉमी रेटने 125 विकेट घेतल्या आहेत.