खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर अपमानित झालेले खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. खडसे यांच्याशी सुरु असलेल्या चर्चेमुळेच आज अजित पवार बीड जिल्ह्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गेवराई, माजलगाव, बीडला येऊ शकले नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

खडसे यांना तिकिट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगरमध्ये आंदोलन पुकारले आहे. खडसेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत होण्याचे आवाहन केलं आहे. परंतु संतप्त कार्यकर्त्यांनी खडसेंना “आता हा अपमान बस झाला, तुम्ही राष्ट्रवादीत चला. निर्णय घ्या अन्यथा आम्ही आत्मदहन करु, आत्महत्या करु” अशा धमक्या दिल्या आहेत.

या कार्यकर्त्यांमुळे खडसेंची गोची झाली असून त्यामुळेच राष्ट्रवादीने खडसेंशी संपर्क साधला आहे. “आतापर्यंत मी भाजपमध्येच होते, आता शेवटच्या क्षणाला कशाला भाजपा सोडायची” अशी भावना खडसे यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवली. मात्र त्यांचे कार्यकर्ते काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. खडसे यांच्यासोबत आणखी काही महत्वाचे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा आणि उद्याचाच दिवस बाकी असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय खळबळ पहायला मिळेल अशी शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

एकनाथ खडसेंच्या उमेदवारीवर गिरीश महाजन म्हणतात

तुझ माझ जमेना तुझ्या वाचून करमेना असं म्हणत शरद पवारांनी दिली माढ्यात बबन शिंदेंना उमेदवारी

मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराने केला राष्ट्रवादीत प्रवेश

सभेत कुत्रा घुसला अन.. पवारांनी उडवली सेनेची खिल्ली