नागपूर प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचारात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस या नागपूर मध्ये विधानसभेचा प्रचार करणार आहेत. या संदर्भातील माहिती स्वतः अमृता फडणवीस यांनी जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात शक्य असेल तिथे त्या प्रचारात उतरणार आहेत. त्याच प्रमाणे नागपूर मधील इतरही मतदारसंघात अमृता फडणवीस भाजपचा प्रचार करणार आहेत.
भाजपचे नेते मंत्री होण्यात रममाण ; भाजप प्रदेशाध्यक्ष पद पडले ओस
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील फेरटी हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. याच गावात पाणीपुरवठा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पाचे उद्धाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला. फडणवीसांनी हे गाव दत्तक घेतल्यापासून या गावाचा मोठ्या प्रमाणात विकास मार्गी लागला आहे. असे येथील लोकांनी सांगितले आहे.
विश्वचषक २०१९ भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असो वा नसो ते माणूस म्हणून निश्चितच चांगले आहेत. त्यांच्या मुख्यमंत्री असण्याने अथवा नसण्याने मला काही फरक पडत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची पत्नी असण्याचे काही तोटे देखील आहेत. देवेंद्रजी नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात. परंतु मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून माझ्यावर काही टीकेचे दगड देखील मारले जातात अशी खंत अमृता फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.
माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!
नवणीत राणा यांनी केली शेतात जाऊन पेरणी, पहा फोटो
महेश लांडगेंना पराभूत केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही
विधानसभा निवडणूक २०१९ : बीडनंतर महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुलत्या पुतण्याची युद्धाची तयारी