मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आहे असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेसोबत काही बोलणेच झाले नाही असे म्हणल्यानंतर ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत फडणवीस घोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना प्रमुखांना मी वचन दिले होते की एक ना एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार. आणि मी माझ्या विचारावर ठाम आहे असे सांगत मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान अमित शहा यांच्याशी माझी याविषयी चर्चा झालेली होती. सत्तावाटपासोबतच मुख्यमंत्रीपदातही फिफ्टी फिफ्टीच्या फोर्म्युलावर आमचे बोलणे झाले होते मात्र आता भाजप आपले असे बोलणेच झाले नाही म्हणत आम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत आहे असंही ठाकरे म्हणाले.