शारजाह मध्ये ४७ मजली इमारतीला भीषण आग; ७ जण घायाळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी रात्री संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह येथे भीषण आगीमुळे अपघात झाला. अल नहदा, शारजाह येथील निवासी इमारतीत भीषण आगीत सात जण जखमी झाले आहेत. खलिज टाईम्सच्या वृत्तानुसार, या सात जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले, तर इतर पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात नेण्यात आले.

शारजाह सिव्हिल डिफेन्सचे महासंचालक कर्नल सामी अल नकबी यांनी सांगितले की, एबीसीओ टॉवरच्या दहाव्या मजल्यावर रात्री ९.०४ मिनिटांनी ही आग लागली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ताज बंगळूर रेस्टॉरंटच्या शेजारच्या इमारतीत ही आग लागली. मात्र, आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

 

आणखी एका अहवालानुसार या इमारतीत पार्किंगशिवाय ४७ मजले आहेत.जिथे आगीवर नियंत्रण मिळवले आहे आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अहवालात असेही म्हटले आहे की अधिकाऱ्यांनी इमारतीत राहणाऱ्या लोकांना तत्काळ बाहेर काढले.

या शहरात मोठ्या प्रमाणात भारतीय प्रवासी राहतात. त्याच बरोबर, भारतीय लोक निवासी टॉवरमध्ये राहतात की नाही हे समजू शकलेले नाहीये. संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय दूतावासाच्या निवेदनाची आता प्रतीक्षा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment