ठाण्यात आणखी एका तरुणाची पाच जणांकडून निर्घृणपणे हत्या

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यातील वर्तकनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाची पाच जणांनी निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. या हत्येप्रकरणी जगदीश नरहीरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागर्जी आणि प्रदीप चव्हाण या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सगळे आरोपी साईनाथ नगर, भीमनगर आणि वर्तक नगर परिसरातील रहिवासी आहेत.

हत्या (Murder) करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव दीपक निर्भवने असे आहे. दीपक निर्भवने याच्यावर हल्ला झाल्यानंतर तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान, दीपकचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय घडले नेमके?
ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारु पिण्याच्या वादातून हा जीवघेणा हल्ला (Murder) करण्यात आला होता. जीवघेण्या हल्ल्यात दीपकच्या छातीमध्ये धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्यामुळे दीपकची प्रकृती गंभीर होती. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…