हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असंघटित क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तीन पेन्शन योजनांमध्ये आतापर्यंत ६४,४२,५५० लोकांनी नोंदणी केली आहे. ज्यांना आता वार्षिकरित्या ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल.आपणही या पेन्शन योजनेत नोंदणी करून आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (पीएम-एसवायएम), पीएम किसान महाधन (पीएम-केएमडीवाय) आणि स्मॉल बिझिनेस पेन्शन योजना या अशा तीन वर्गांसाठी समर्पित अशा योजना आहे की त्यांना म्हातारपणात कुणापुढेही हात पसरवावे लागणार नाही. म्हणूनच त्यांमध्ये बर्याच नोंदी झालेल्या आहेत. आपणही नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.या तीनही योजनांमधील बहुतेक अटी समान आहेत.चला तर मग या तीन योजनांविषयी जाणून घेऊयात.
पीएम श्रमयोगी मानधन योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मार्च २०१९ रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा औपचारिक शुभारंभ केला. यासाठीची नोंदणी १५ फेब्रुवारीपासून सुरू झाली.दरमहा वेतन आणि असंघटित क्षेत्रातील मजुरांना पेन्शन देण्यासाठीची ही योजना सर्वात मोठी योजना आहे. या योजनेंतर्गत कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यावर वर्षाकाठी ३६,००० रुपये पेन्शन मिळणार आहे.
संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ), राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) किंवा राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ईएसआयसी) किंवा आयकर भरणारे सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. महिन्याकाठी १५,००० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीच ही योजना आहे. ही योजना देशातील सुमारे ४२ कोटी कामगारांना समर्पित केलेली आहे.५ मे पर्यंत ४३,८४,५९५ लोक यामध्ये सामील झाले आहेत.
पीएम किसान मानधन योजना
पीएम मोदी यांनी १२ सप्टेंबर २०१९ रोजी झारखंडमधून ही योजना सुरू केली होती. पण त्याअंतर्गत नऊ ऑगस्टपासून नोंदणी सुरू झाली. पीएम किसान मानधन योजना ही शेतकर्यांना समर्पित ही सर्वात मोठी पेन्शन योजना आहे. आतापर्यंत २०,१९,२२० शेतकरी जोडले गेले आहेत, ज्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यावर दरमहा ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे. सर्व १२ कोटी लघु व सीमांत शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील. लहान आणि सीमांत शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे २ हेक्टरपर्यंत किंवा त्याहून कमी शेती आहे.
या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर एखादा शेतकरी पंतप्रधान-किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेत असेल तर यासाठी त्यांच्याकडून कोणतीही कागदपत्रे घेतली जाणार नाहीत. या योजनेंतर्गत शेतकरी पंतप्रधान-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभामध्ये थेट योगदान देण्यास निवडू शकतात. अशा प्रकारे, त्याला त्याच्या थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
प्रधानमंत्री लघु व्यापारिक मानधन योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ सप्टेंबर २०१९ रोजी झारखंडच्या रांची येथे लहान व्यापाऱ्यांना पेन्शनची आश्वासकता दिली. छोट्या व्यापाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्याचा पुढाकार या प्रधानमंत्री लघू व्यापरी मानधन योजनेंतर्गत घेण्यात आला. त्याअंतर्गत ६० वर्षांच्या वयानंतर त्याला ३६,००० रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. ही योजना सर्व दुकानदार, स्वयंसेवक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी असून वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. ईपीएफओ, ईएसआयसी सदस्य आणि आयकर भरणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत ३८,७३५ छोट्या व्यावसायिकांनी त्यात नावनोंदणी केलेली आहे.
निवृत्तीवेतन योजनेच्या सामान्य अटी
(१) तिन्ही योजनांचे वय १८ ते ४० वर्षे असावे.
(२) ईपीएफओ, ईएसआयसी सदस्य आणि आयकर भरणाऱ्यांना लाभ मिळणार नाही.
(३) आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.
(४) वयानुसार प्रीमियम ५५ ते २०० रुपये असेल.एवढेच पैसे सरकार देईल.
(५) वयाच्या ६० वर्षानंतर, महिन्याला ३,००० रुपये पेन्शन.
(६) नजीकच्या सामान्य सेवा केंद्रात (सीएससी) नोंदणी करता येते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.