६५ वर्षीय कलाकारांच्या कामावर बंदी ;राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयावर जेष्ठ अभिनेत्रीने उठवला आवाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दिवसापासून देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक उदयोग धंदयावर अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. लॉकडाउनच्या काळात अनेक चित्रीकरण सुद्धा बंद होत. परंतु लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणास सरकारने अखेर परवानगी दिली आहे. परंतु या परवानगीमध्ये महाराष्ट्र सरकारने एक अट घातली आहे. ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगमध्ये समावेश करता येणार नाही. त्यामुळे या पूर्वी अनेक जेष्ठ कलाकारांनी आवाज उठवला होतो. काही भाग हे वयस्कर लोकांसाठी असतात त्यात तेथे त्याची गरज हि असते. महाराष्ट्र सरकारच्या या नियमाविरोधात पुन्हा एकदा जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांनी टीका केली आहे. आम्हाला दाम नकोय तर आम्हाला काम हव आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

लॉक डाउन अनेक भागात शिथिल केलं आहे. त्यांनी बॉलिवूड लाईफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सुरेखा सीकरी यांनी सरकारच्या लॉकडाउन नियमांविरोधात आवाज उठवला. त्या म्हणाल्या, “लॉकडाउनमुळे माझ्यासारख्या अनेकांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मी अनेक ठिकाणी काम केले आहे. अगदी सिनेमांमध्ये सुद्धा मी छोटेमोठे रोल केले आहेत. पण ज्या मालिकांमध्ये मी काम केलं त्यांचे पैसे मला अजूनही मिळालेले नाहीत. त्यामुळे ही आर्थिक टंचाई उद्भवली आहे.हि अडचण माझ्याच बाबतीत नव्हे तर अनेक कलाकारांना हि समस्या उध्दभव आहे. मात्र मला माझ्या समस्यांची जाहीरात करायची नाही. कारण मला कोणाकडूनही दान नकोय मला फक्त काम हवंय. सरकारने ६५ वर्षांवरील कलाकारांसाठी तयार केलेला हा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे. त्यांनी हा नियम त्वरीत रद्द करावा, जेणेकरुन माझ्यासारख्या जेष्ठ कलाकारांना कंची संधी मिळेल आणि आम्ही आमचे पोट भरू शकू “

सुरेखा सीकरी या अनेक वर्षांपासून बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या आहेत. मालिकांमधील यांच्या भूमिका लोकांच्या लक्षात राहण्यासारख्या आहेत. सुरुवातीला १९७८ साली किस्सा कुर्सीका या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांचा या क्षेत्रातील कामाचा आलेख वाढतच गेला. त्यानंतर ‘नसीब’, ‘सरफरोश’, ‘हेरा फेरी’, ‘देवडी’, ‘बधाई हो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांनी अनेक चित्रपटांशिवाय मालिकांमध्येही त्यांनी प्रचंड काम केलं आहे. त्यांच्या आजीच्या भूमिका खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. १९९० साली सांझा ‘चूल्हा’ या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलें होते. त्यानंतर त्यांनी ‘कभी कभी’, ‘बुनियाद’, ‘सीआयडी’, ‘केहना है कुछ हमको’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये त्यांनी काम होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment