7 वर्षांच्या मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, आत्महत्या की हत्या? गूढ कायम

suicide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरीत जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ल गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सात वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण लांजा तालुका हादरून गेला आहे. मात्र या मुलीच्या कुटुंबीयांनी या मुलीची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आर्या राजेश चव्हाण असे या सात वर्षीय मृत मुलीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत आर्याचा मृतदेह रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. मुलीच्या कुटुंबीयांनी तिची हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. यामुळे मृत आर्याच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले आहे.

राहत्या घरात अढळला मृतदेह
लांज्यातील राजेश चव्हाण यांची मुलगी असलेल्या सात वर्षांची आर्या हीच्या मृत्यूने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. या मुलीचा मृतदेह राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला त्यामुळे या मुलीनं आत्महत्या (suicide) केली, असं सांगण्यात आले. यामुळे मृत मुलीच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या मुलीच्या नातेवाईकांना आर्याने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करावी, असे मृत मुलीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. आर्याच्या वडिलांनी दोन लग्न केली आहेत. त्यांच्या दुसऱ्या पत्नीला तीन मुलं आहेत. तर आर्या ही पहिल्या बायकोपासून झालेली सगळ्यात लहान मुलगी होती. राहत्या घरात एवढी लहान मुलगी स्वतःला गळफास कसा काय लावू घेऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आर्याने आत्महत्या (suicide) केली कि तिची हत्या झाली याचा तपास पोलीस करत आहेत.

हे पण वाचा :
काळाचा घाला! डॉक्टरांकडे उपचारांसाठी जात असताना सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू

IND vs SA T-20 : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच एकमेकांबरोबर भिडले फॅन्स

सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त

…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका