हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही लहान मुले एका पेक्षा एक मोठ-मोठी कमाल करत असतात. लहान वयात अशी कामगिरी करत असतात तशी कामगिरी करायला मोठ्या लोकांनाही खूप मेहनत लागते. अशाच प्रकारचे काम म्हणजे स्वयंपाक बनवणे! स्वयंपाक बनवणे हे मोठ्या वयातील लोकांचे आणि ज्यांचा हात बसला आहे अशा लोकांचा प्रांत मानला जातो. परंतु काही लहान मुले सुद्धा यामध्ये आपले प्रभुत्व दाखवताना दिसत आहेत. केरळच्या हयान अब्दुल्ला या नऊ वर्षीय मुलाने या क्षेत्रामध्ये मोठे नाव केले आहे.
केरळच्या कोझिकोडे येथे राहणाऱ्या नऊ वर्षीय हयानने आशिया रेकॉर्ड केले आहे. एका तासामध्ये 172 डिश बनवण्याचे रेकॉर्ड त्याने केले आहे. हे रेकॉर्ड, ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंदवले गेले आहे. अगदी लहान वयापासूनच त्याचा कुकिंग या विषयांमध्ये इंटरेस्ट होता. हयान याने बनवलेल्या 172 डिशमध्ये पॅन केक, बिर्याणी, ज्युस, डोसा, सलाद, मिल्कशेक तसेच चॉकलेटचा समावेश आहे. कोविड- 19 मुळे हे कॉम्पिटिशन ऑनलाइन आयोजित केले होते.
हयानच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले की, हयान चार वर्षाचा होता त्यावेळेस पासूनच तो स्वयंपाकामधे त्यांची मदत करत असे. हयान याने फास्ट कुकिंगमध्ये सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले आहे. सध्या हयान तिसऱ्या वर्गांमध्ये शिकत आहे. त्याचा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे. Hayan Delicacies या नावाने तो यूट्यूब चॅनल चालवतो. त्याचे वडील चेन्नईमध्ये एक रेस्टॉरंट चालवतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.