सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |
कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगांव येथे विहीरीत पोहायला शिकायला गेलेला शाळकरी मुलगा श्रेयस प्रकाश कुलकर्णी याचा पाठीवर बांधलेली टायर ट्यूब निसटल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर सांगलीच्या बचाव पथकाने मृतदेह काढला.ही घटना मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. श्रेयस व त्याचे गावातील तीन चार मित्र अग्रणी नदीच्या काठावरील पिंटू पाटील यांच्या विहीरीत पोहायला गेले होते.इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकणारा श्रेयस हा नुकताच पोहायला शिकत होता.
सकाळी पाठीला टायर ट्यूब बांधून तो विहीरीत उतरला परंतु काही क्षणांतच पाठीला बांधलेली ट्यूब निसटली गेली.व तो बुडू लागलात विहीरीत पोहणारे त्याचे तीन चार मित्रांनी वाचवायचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. सदरची माहिती समजताच सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील व गावकरी विहीरीजवळ गोळा झाले. विहीरीत ५० ते ६० फूटपाणी होते. दोन तीन तास शोधूनही मृतदेह सापडला नाही.अखेर हिंगणगांवचे माजी उपसरपंच अनंत पाटील यांनी प्रयत्न करून त्यांच्या परिचयातील सांगली येथील बचाव पथकाला बोलावले.
कवठेमहांकाळचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.त्यावेळी काही तरूणानी विहीरीत बुडून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला आहे.सांगली येथील आयुश हेल्थ केअरच्या बचाव पथकातील तीन चार जवानांनी तीन चार तास पाण्यात बुडून शोध घेतला.बचाव पथकाच्या जवानांनी चार तास अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.