हॉटेलमध्ये जेवण करताना महिलेने दुसऱ्या कस्टमरच्या मोबाईलवर मारला डल्ला; CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – आपण आजपर्यंत अनेक चोरीच्या (stolen) घटना पहिल्या असतील. या घटनांमध्ये चोर अगदी गर्दीच्या ठिकाणी आपली हातचालाखी दाखवत चोरी (stolen) करत असतात. सध्या अशीच एक चोरीची (stolen) घटना पंढरपूरमध्ये घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पंढरपूरमध्ये ‌हॉटेल जायका जुना कराड नाका येथे एका महिलेने आपली हातचलाखी दाखवत हॉटेलमध्ये जेवण करताना दुसऱ्या एका ग्राहकाचा मोबाइल चोरला (stolen) आहे. हि संपूर्ण चोरीची घटना हॉटेलमध्ये असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत हॉटेलमध्ये दुसरे कस्टमर जेवण करायला आल्यावर एका टेबलवर मोबाईल विसरून गेले होते. यानंतर सदर महिला त्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली. यावेळी तिला कोणाचातरी फोन समोरच्या टेबलवर विसरल्याचं दिसलं. यानंतर या महिलेने कोणाचे लक्ष नसल्याचे बघत त्या कस्टमरचा मोबाईल चोरला.

या महिलेने मोबाईल चोरल्यानंतर (stolen) तो आपल्या पर्समध्ये ठेवला. चोरीच्या या घटनेचा व्हिडिओ हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या या महिलेचा शोध सुरु आहे.

हे पण वाचा :
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे
राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार
लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा भीषण अपघात
सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?
पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल