परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे |
परभणी जिल्ह्यातील झरी येथे एका वानर टोळीने मागील काही दिवसापासुन उच्छाद मांडला असून बुधवारी सकाळी त्यातील पिसाळलेल्या एका वानराने कडाडून चावा घेऊन महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने गावात भातीचे वातावरण पसरले आहे .
पाथरी तालुक्यातील झरी गाव शिवारात वानराच्या टोळीने मागील काही महिन्यापासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गाव परिसरात ये -जा करणा-या ग्रामस्थांवर हल्ला केल्याच्या घटनेने भितीचे वातावरण निर्माण झाले असताना बुधवार १o जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास एका महिलेवर याच टोळीतील एका वानराने हल्ला करून कडाडून चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यावेळी जखमी महिलेला उपचारासाठी मानवत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असुन हल्लेखोर वानरांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांनी वन विभागाला मागणी केली आहे.
मागील अनेक दिवसापासून वन विभागाला यासंबंधी वारंवार तक्रार करूनही वन विभागाने या प्रकारे कडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे .
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.