हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अयोध्येत उद्या राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. मात्र भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी सध्या अयोध्येपासून कोसो दूर असणाऱ्या बाबरी विध्वंस केस मध्ये स्वतःच्या निरपराधी असण्याचे पुरावे गोळा करत आहेत. उद्या भूमिपूजन होणार असले तरी या आंदोलनाचा पाया ज्यांनी रोवला ते भाजपाचे हे नेते उद्याच्या या समारंभाला नसणार आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह हे देखील या समारंभात सहभागी होण्याची शक्यता नाही आहे. अडवाणी, जोशी यांनी हे आंदोलन पुढे आणले आहे. कोरोना संकट पाहता त्यांना समारंभास बोलावले नसल्याचे सांगितले जाते आहे.
मंदिर निर्माण आंदोलनासाठी १९९० साली अडवाणी यांनी गुजरात ते अयोध्या अशी रथयात्रा सुरु केली होती. मात्र बिहारचे तात्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवाणींना अटक केले होते. मागच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराचा निर्णय झाला तेव्हा आपण या आंदोलनाशी जोडले गेलो याचा आनंद त्यांनी व्यक्त केला होता. अडवाणींच्याच नेतृत्वाखाली १९९२ मध्ये भाजपा ला यश मिळाले होते. त्याचवेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते. मात्र मोदी युग सुरु झाल्यापासून अडवाणी हळूहळू अंधारात गेल्याचे दिसून येते आहे. सध्या ते पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात आहेत.
राम मंदिर आंदोलनाच्या वेळी मुरली मनोहर जोशी भाजपाचे दुसरे मोठे नेते होते. त्यांनी आंदोलनासाठी योजना आखल्या आणि पूर्ण ताकदीने त्या राबविल्या. या आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जोशी यांच्या जुगलबंदीची छायचित्रे आजही पाहायला मिळतात. २०१४ नंतर मुरली मनोहर जोशीही हळूहळू बाजूला गेले असून तेही सध्या मार्गदर्शक मंडळात उपस्थित आहेत. उमा भारतीनी देखील हिरीरीने आंदोलनात सहभाग घेतला होता. बाबरी विध्वंस च्या तपासात त्या दोषी आढळल्या होत्या. त्यानंतरही वाजपेयी आणि मोदी अशा दोन्ही सरकारच्या वेळी त्या मंत्री होत्या. त्या अयोध्येत जाणार आहेत मात्र त्यांची प्रतिष्ठा पूर्वीइतकी राहिलेली नाही. आपल्या ट्विटरवरून, कोरोना संक्रमणापासून बचावासाठी पंतप्रधान मोदी आणि समूह गेल्यानंतर तिथे जाणार आहे’ असे त्यांनी सांगितले आहे.
बाबरी मशिद विध्वंस प्रकारात अडवाणी आणि जोशी यांनी आम्ही निरपराध असल्याचे पुरावे देणार असल्याचा दावा केला आहे. मागच्या आठवड्यात कोर्टाने ३२ पैकी ३१ आरोपींचे जबाब घेतले होते. श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्राचे सचिव डॉ. अनिल मिश्र यांच्या नुसार कार्यक्रमात १७५ लोकांची यादी करण्यात आली आहे जे या समारंभात सहभागी होतील. यामध्ये रिअल इस्टेट प्रतिनिधी, स्थानिक जनप्रतिनिधी, आणि अयोध्याच्या संत महंतांचा समावेश असणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.