नवी दिल्ली । आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जगातील दुसर्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक असलेल्या एलन मस्क यांनी काल बुधवारी संपूर्ण रात्र कारमध्ये घालविली. आता तुम्ही विचार करत असाल, असा काय गोंधळ उडाला असावा, की एवढ्या श्रीमंत माणसाला, ज्याला कशाचीही कमतरता नाही, त्याला एक रात्र गाडीत घालवावी लागली. वास्तविक, घडले असे की, अमेरिकेच्या टेक्सास येथे बुधवारी रात्री जोरदार हिमवृष्टी झाली. यामुळे, मस्क यांना स्वत: ला गरम ठेवण्यासाठी संपूर्ण रात्र कारमध्ये घालवणे चांगले वाटले.
मीडिया रिपोर्टनुसार टेक्सास राज्यात सध्या सुरू असलेल्या ऐतिहासिक वीज संकटाच्या पकडातही मस्कही आले आहेत. त्यानंतर, कडक थंडी आणि हिमवादळापासून बचाव करण्यासाठी आणि स्वत: ला उबदार ठेवण्यासाठी मस्क यांना इलेक्ट्रिक कारमध्ये झोपावे लागले. तथापि, यानंतर मस्कने टेक्सास राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या ग्रिड ऑपरेटरवर खूप संताप व्यक्त केला. या वीज संकटावर, मस्कने ऑपरेटरला बेजबाबदार असल्याचेही सांगितले. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर, टेक्सास राज्यातील 30 लाख लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तर 21 जणांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे.
बुधवारी टेक्सास राज्यातील 30 लाख लोकांना विजेशिवाय आपली रात्र अंधारात घालवावी लागली. एलन मस्क देखील वीज संकटाच्या जोखडात आला आणि त्यांना एका रात्रीसाठी कारलाच स्वतःचे घर बनवावे लागले. विशेष म्हणजे, कित्येक महिन्यांपासून अव्वल क्रमांकावर असणार्या एलन मस्क यांना कालच अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी मागे टाकले. त्याबरोबरच आता एलन मस्क हे आता दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. वास्तविक, टेस्ला इन्कच्या शेअर्समध्ये मंगळवारी घसरण नोंदविण्यात आली ज्यामुळे मस्क हे पहिल्या स्थानावरून दुसर्या स्थानावर घसरले. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्स नुसार, जेफ बेझोसची एकूण मालमत्ता सुमारे 14.10 लाख कोटी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.