जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनल्यानंतर, एलन मस्कने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, पाहून आपणही चकित व्हाल

0
23
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. गुरुवारी त्यांनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार स्पेसएक्स आणि टेस्लाच्या संस्थापकाकडे आता एकूण 195 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मस्कच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, त्यांची कंपनी टेस्ला अपेक्षेनुसार कामगिरी करत नव्हती आणि त्याला आपली कंपनी विकायची होती. मात्र, आता त्याच कंपनीमुळे गुरुवारी मस्कने हे स्थान मिळवले आहे. गुरुवारी व्यापारादरम्यान टेस्लाच्या शेअर्समध्ये 8.8 टक्क्यांनी वाढ झाली.

‘टेस्ला ओनर्स ऑफ सिलिकॉन व्हॅली’ हँडलवरून एक ट्विट आले आहे, ज्याने ट्विटरवर एलन मस्कबद्दलची ही बातमी शेअर केली आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “एलन मस्क आता 195 अब्ज डॉलर्सची संपत्ती मिळवून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.” या ट्वीटचा संदर्भ घेत मस्कने लिहिले की, “हाऊ स्ट्रेंज”

https://twitter.com/teslaownersSV/status/1347201514930991105?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347204459147902978%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

यानंतर, पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “ठीक आहे, पुन्हा कामावर …”

https://twitter.com/elonmusk/status/1347204459147902978?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347204606414131200%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

एलन मस्कच्या या ट्विटवर लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला.

https://twitter.com/romafades/status/1347244085355147265?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347244085355147265%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

 

https://twitter.com/TobyH2020/status/1347235714237423616?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347235714237423616%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

 

https://twitter.com/Phoenix_tc_/status/1347240630221729794?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347240630221729794%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

https://twitter.com/BeingSmeet1012/status/1347416968203104256?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347416968203104256%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

2020 मध्ये टेस्लाच्या शेअर्सने 743 टक्क्यांनी उडी घेतली
वास्तविक, मस्कच्या मालमत्तेत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समधील प्रचंड वाढ. 2020 मध्ये कंपनीने लग प्रॉफिट मिळवल्याने तसेच S&P 500 इंडेक्स मध्ये सामील झाल्यानंतर टेस्लाचे शेअर्स 743 टक्क्यांनी वाढले आहेत.

https://t.co/wqE1O4IF3v?amp=1

मस्कच्या मालमत्तेवर आर्थिक मंदी किंवा कोरोना महामारीचा कोणताही परिणाम होणार नाही
नोव्हेंबर 2020 मध्ये, बिल गेट्स यांना मागे टाकून एलन मस्क जगातील दुसर्‍या श्रीमंत माणसाच्या खुर्चीवर बसला होता. त्यावेळी त्यांच्याकडे 128 $ अब्ज डॉलर्सची संपत्ती होती. गेल्या 12 महिन्यांत, एलन मस्कची संपत्ती 150 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त (सुमारे 11 लाख कोटी) वाढली आहे. आर्थिक मंदी किंवा कोरोना विषाणूच्या साथीमुळे मस्कच्या मालमत्तेवरही कोणताही परिणाम झालेला नाही.

https://t.co/jOiVSDb2wh?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here