परदेशातून आल्यावर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला स्वतःमध्ये आढळले कोरोनाची लक्षणे , नंतर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जग हे कोरोना व्हायरसच्या हाहाकाराने त्रासले आहे. भारत मध्ये देखील या महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली,जी १४ एप्रिल रोजी संपणार होती.यामुळेच परदेशातून जाऊन आलेले लोकं सध्या चिंतीत आहेत. या दरम्यान बॉलीवुड अभिनेत्री कृती खरबंदानेही तिच्या आरोग्याशी निगडित एक मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली कि परदेशातून जाऊन आल्यावर तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली,ज्यामुळे ती खूपच घाबरली.

मुंबई मिररला दिलेल्या इंटरव्यूमध्ये कृतिने सांगिले की,’काही दिवसांपूर्वीच मी पदेशातून जाऊन आले,तेव्हा माझ्या मध्येही काही लक्षणे जाणवू लागली.त्यावेळी देशात कोरोना व्हायरसच्या टेस्टची किट नव्हती.अशाच प्रकारे तिने डॉक्टरांशी संपर्क साधला आणि लोकांशी भेटी-गाठी सोडून स्वत:ला क्वारंटाईन केले. परंतु या काळात तिला ताप आला नव्हता,परंतु ती खूप घाबरली होती.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कृतिनेने काही दिवस स्वतःला क्वारंटाईन केले आणि काही दिवसांनंतर तिला चांगले वाटू लागले.तिने सांगितले कि या काळात ती पुलकित सम्राट याच्याबरोबर रहात होती.यागोष्टीबाबत ती खूप रिलॅक्स फील करत होती.जर एकटी राहिले असते तर खूप अडचणींना तोंड द्यावे लागले असते.


View this post on Instagram

 

Us! ???? . . #Repost @pulkitsamrat with @get_repost ・・・ ???? #PrettyKharbanda

A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda) on Feb 27, 2020 at 4:28am PST

 

 

फक्त सामान्य लोकच नाही तर बॉलीवूड सेलेब्स पण कोरेनाच्या जाळ्यात अडकले आहेत.बॉलीवूड सेलिब्रिटीजपैकी सर्वात आधी ‘बेबी डॉल’ सिंगर कनिका कपूर हि कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.करीम मोरानी आणि पूरब कोहली सारखे सेलेब्जही कोरोनाला पॉझिटिव्ह झालेले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –