हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Play Store मधून Paytm काढून टाकल्यानंतर, अँड्रॉइड सिक्युरिटी अँड प्रायव्हसी प्रॉडक्टच्या उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन कॅसिनोला परवानगी देत नाही किंवा आम्ही खेळाच्या सट्टेबाजीला चालना न देणार्या जुगार अॅप्सनाही समर्थन देत नाही. यात अशा काही अॅप्सचा देखील समावेश आहेत जे ग्राहकांना इतर वेबसाइटवर पाठवितात जेथे पेड टूर्नामेंटमध्ये ते खरे पैसे किंवा कॅश बक्षिसे जिंकू शकतात, हे आमच्या पॉलिसीचे उल्लंघन आहे.
आता डिपॉझिट केलेल्या रक्कमेचे काय होणार ?
Google ने Play Store वरून Paytm अॅप काढून टाकल्यानंतर Paytm ने म्हटले आहे की,’Paytm अॅप प्ले स्टोअरमधून तात्पुरते काढून टाकले गेले आहे. Paytm ने ट्वीट करून म्हटले आहे की, Paytm सध्या Google Play Store वर उपलब्ध नाही आहे, मात्र आम्ही लवकरच परत येऊ. आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आपण लवकरच पूर्वीप्रमाणेच Paytm अॅप वापरु शकाल.
गेल्या काही दिवसांत Google ने 200 हून अधिक अॅप्स काढले होते
भारत सरकारच्या आदेशानुसार भारतात 200 हून अधिक चिनी अॅप्सना बंदी घातली आहे. या अॅप्समध्ये टिकटॉक आणि PUBG मोबाइल ही मोठी नावे आहेत, ज्यांचे भारतात कोट्यावधी युझर्स होते. या अॅप्सवर भारतीय युझर्सच्या डेटा प्रायव्हसीचा आरोप आहे. ज्यानंतर हे अॅप्स भारतातील Google Play Store आणि Apple Store वरून काढण्यात आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.