हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी गुजरात निकालावर भाष्य केले आहे. भाजपाला मिळणाऱ्या हिंदू मतांचा वाटा मोठा असल्यानेच त्यांचा विजय होत असल्याचे ओवेसींने म्हंटले आहे. यावेळी बोलताना ओवेसींनी (asaduddin owaisi) काँग्रेस आणि आम आदमी पक्षालासुद्धा टार्गेट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण आहे यासाठी हा राजकीय लढा सुरु असल्याचा गंभीर आरोपदेखील असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी यावेळी केला.
तसेच “भाजपाला जास्तीत जास्त हिंदू मतं मिळत असल्याने त्यांचा विजय होत आहे. पण तेलंगणा, हैदराबाद किंवा केरळसारख्या राज्यांमध्ये ते कधीही प्रवेश करु शकणार नाहीत,” असे आव्हान असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी भाजपला दिले आहे. “भाजपाची मुस्लीम समाजाशी कोणतीही जवळीक किंवा नातं नाही. दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षसुद्धा हेच करत आहे असा दावादेखील ओवेसींनी यावेळी केला.
गडकरींना दिले आव्हान
ओवेसी (asaduddin owaisi) यांनी यावेळी समान नागरी कायद्यावर भाष्य करताना भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरदेखील निशाणा साधला. नितीन गडकरी यांनी समान नागरी कायद्यासंबंधी बोलताना चार पत्नी असणं अनैसर्गिक असल्याचे मत व्यक्त केले होते.
हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..