हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यातील पहाटेच्या शपथविधीमागील कारण सांगितले. मी अजित पवारांना भाजपासोबत पाठवले असते तर त्यांनी सरकारच स्थापन केले असते. त्यांनी अर्धवट काम केले नसते, असे पवारांनी सांगितले. याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारताच त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोनच शब्दात उत्तर दिले. ‘नो कमेन्ट्स’ असे पवार यांनी म्हणत अधिक बोलणे टाळले.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत एका कार्यक्रमात अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीमागील कारणही सांगितले. याबाबत अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी सुरुवातीला नो कमेंट्स असे उत्तर दिले. तसेच ते पुढे म्हणाले की, मी याबाबत काही बोलू शकत नाही. ज्यावेळी मला वाटेल तेव्हा मी बोलेन. कधी बोलायचे हा माझा अधिकार आहे. शरद पवार यांनी काय सांगितले आहे ते सर्वांनी ऐकले आहे, असेही यावेळी पवार यांनी म्हंटले.
2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेचा शपथ विधीच्या घटनेवरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. पहाटेच्या शपथविधीमागे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आलेला होता. त्याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचेही पवार यांनी सांगितले होते. मात्र, आज दोन वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीमागचा गौप्यस्फोट केला.