हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सलियनबाबत केलेल्या वक्तव्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादे वक्तव्य केल्यास त्याचा तपास करणे हा एक प्रक्रियेचा भाग असतो. कोणी काय तक्रार करायची त्यात तथ्य असेल तर कारवाई होते. त्यात तथ्य नसेल तर कारवाई होत नाही, असे पवार यांनी म्हंटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दिशा सलियन मृत्यू प्रकरणी सध्या तपास सुरु आहे कि कोणी काय आणि कोणती वक्तव्ये केली आहेत. सलियन प्रकरणी ज्यांनी कोणी काही विधाने वापरली असतील त्याची चौकशी हि केली जात आहे.
चौकशी करणे हा एक तपासातील प्रक्रियेचा भाग असतो. तक्रारीमध्ये काही तथ्य असेल तर कारवाई हि होते. आणि चौकशीत मिळालेल्या माहितीत तथ्य नसेल तर कारवाई होत नाही, असे पवार यांनी म्हंटले.