हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या रोखठोक, फटकळ स्वभावासाठी आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. एखादी गोष्ट पटली नाही तर समोर कोण आहे हे न बघताच ते जाग्यावरच खडेबोल सुनावतात. आज याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून आता त्यांनी जाहीर भाषणातच पक्षातील पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. कोणीही भाडायचं नाही, नाहीतर एका- एकाच्या कानाखाली आवाज काढीन, असं म्हणत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला .
येत्या १० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. यासाठीची तयारी करण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत बोलताना अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले. आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, मुळशीच्या लोकांनी देखील काम करायचं आहे. त्यांना सुद्धा आपण पद दिली आहेत. त्यामुळे भाडायचं नाही, नाहीतर एका-एकाच्या कानाखाली आवाज काढीन. कारण यातुन आमची बदनामी होते. तुमची नाही असं म्हणत अजित पवारांनी नेत्यांना खडेबोल सुनावले.
तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी असता. परंतु ही कोणती पद्धत आहे? हा कोणता फाजिलपणा चाललाय? त्यामुळे इथून पुढे मला असलं काही दिसून आलं, तर पदाचा राजीनामा घेणार आणि टोकाचा वागेन असं म्हणत अजित पवारांनी पधाधिकाऱ्याना चांगलंच सुनावलं आहे. मतभेद असतात. पण आपण पक्षाची बदनामी का करायची? असा सवालही अजितदादानी केला