Tuesday, June 6, 2023

राष्ट्रपतींना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकमत नाहीच; ‘त्या’ मुद्द्यावर भाजपचा आक्षेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मात्र या भेटीत देखील सर्व नेत्याचं एकमत नसल्याचे दिसून आले.

या शिष्टमंडळाकडून राष्ट्रपती कोविंद यांना एक निवदेन देण्यात आलं. या निवेदनावर संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही आहे. पण भाजपच्या प्रतिनिधी रणजित सिंह निंबाळकर यांनी या निवदेनावर सही करणं टाळलं असल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी याबाबत विचारला केली. राष्ट्रपतीनी चौकशी केल्यानंतर मात्र भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या निवेदनावर स्वाक्षरी केल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात एकी नसल्याचं दिसून आलं.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 50 टक्के आरक्षणची मर्यादा शिथील करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींनी केली आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी भाजपचा पुर्ण पाठिंबा आहे. पण, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्यावर एकमत नाही, असं भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं.