धुळे : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी सरकारमधील मंत्र्यांचे शेतकऱ्यांशी कोणतंही देणंघेणं नसल्याचा आरोप दानवे (Ambadas Danve) यांनी यावेळी केला.
काय म्हणाले अंबादास दानवे ?
निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवलं आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांना नवं नाव आणि चिन्ह देण्यात आलं आहे. यातील ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले. या चिन्हावरून अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवर टीका केली आहे. मशाल ही मजबूत हातात आहे. तुम्ही तुमचं कमळ सांभाळा. हीच शिवसेना आणि मशाल तुम्हाला महाराष्ट्रात नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नसल्याचा गंभीर इशारा अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला.
या दौऱ्यादरम्यान अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री हे फक्त निवडणुकांपुरते जिल्ह्यात येतात आणि निघून जातात, असा आरोप करत अंबादास दानवे यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरदेखील निशाणा साधला आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती