मुंबईत वळणावळणावर खड्डे मिळतील पण शोधायला गेला तर आरोपी नाही मिळणार; अमृता फडणवीसांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी साचू लागले आहे. मुंबईत तर रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने वाहने अडकून पडत आहेत. तर काही नागरिकांना खड्ड्यात पडून दुखापती होत आहे. या खड्ड्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून मुंबईतील खड्ड्यात पाणी साचलेला फोटो शेअर केला आहे. तसेच म्हंटले आहे कि, मुंबईत वळणा वळणावर खड्डे सापडतील मात्र, राज्य सरकारला आरोपी काही सापडणार नाहीत.

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या ट्विटर आकाउंटवरून करीत असलेल्या टीकेमुळे नेहमिच चर्चेत येतात. सध्याही त्यांनी टएक ट्विट केल्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी एक ट्विट करीत मुंबई पालिकेच्या दुर्लक्षामुळे मुंबईत पडलेले खड्डे व त्यामध्ये साचलेले पावसाचे पाणी यांचा संबंध राज्यसरकारच्या कारभाराशी जोडला आहे.

अमृता फडणवीस यांनी मुंबईतील खड्ड्यांतील पाण्याचा फोटो शेअर करीत आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, मुंबईत वळणा वळणावर खड्डे सापडतील. प्रत्येक वळणावर तलाव मिळतील पण शोधायला गेल्यावर एकही आरोपी नाही मिळणार, असे सांगत राज्य सरकारवर अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे.