हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इरफान पठाण याने नुकतेच एका मुलाखतीत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर आणि माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना त्याचे करिअर खराब करण्यासाठी दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे म्हंटले होते. त्याच्या या वक्तव्यामुळे तो चर्चेत होता. एका वृत्तवाहिनीने त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून त्याचे हे विधान प्रसारित केले होते. यावर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. त्यावर एका तरुणीने केलेल्या कमेंटमुळे इरफान पठाण दुःखी झाला आहे. याबद्दल त्याने त्या तरुणीच्या कमेंटसहीत स्क्रिनशॉट शेअर करत ट्विटरवर एक पोस्ट केली आहे.
कृतिका नावाच्या एका तरुणीने इरफान पठाणचे नाव घेऊन तो पुढचा हाफिज सईद होण्याची महत्त्वाकांक्षा लपवत नाही आहे, हे विचीत्ररित्या घृणास्पद आहे अशी कमेंट केली आहे. या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करत इरफान पठाण व्यक्त झाला आहे. “ही काही लोकांची मानसिकता आहे, कुठे पोहोचलो आहोत आपण? लाजिरवाणे… असंतुष्ट…” अशी पोस्ट त्याने केली आहे. यावरून त्याला कमेंटमुळे वाईट वाटल्याचे दिसून येत आहे आणि आपली नाराजी त्याने जाहीररीत्या व्यक्त केली आहे.
This is the mentality of certain ppl. Where have we reached ? #shame #disgusted pic.twitter.com/nlLh9vTwS6
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 2, 2020
दरम्यान हाफिज मुहम्मद सईद हा भारतात जन्मलेला पाकिस्तानी इस्लामिक अतिरेकी होता, जो लष्कर-ए-तोयबाचा सह-संस्थापक आणि जमात-उद-दावाचा प्रमुख होता. मुख्यतः तो पाकिस्तानमधून कार्यरत असायचा. एप्रिल २०१२ मध्ये २००८ मध्ये मुंबईच्या बॉम्बहल्ल्यात १६४ नागरिकांना मारल्यामुळे अमेरिकेने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलर चे बक्षीस जाहीर केले होते. नुकतेच त्याचे पाकिस्तानमध्ये निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.