अनुराग कश्यपचा मोठा निर्णय, कोरोना किटच्या मदतीसाठी फिल्मफेअर अवॉर्डचा करणार लिलाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे परिस्थिती दिवसेंदिवस खराब होते आहे. सध्या आरोग्य विषयक गोष्टींची कमतरता देखील जाणवते आहे. त्यामुळे देशातील कोरोना टेस्टिंग किटच्या कमतरतेवर मात करण्यासाठी बॉलीवूड दिगदर्शक अनुराग कश्यपने एक मोठा निर्णय घेतला आहे. अनुराग कश्यप आता आपल्या फिल्मफेअरच्या ट्रॉफीचा लिलाव करणार आहे आणि ज्यातून मिळाणारे पैसे तो कोरोना टेस्टिंग किट खरेदी करण्यासाठी वापरणार आहे. हॉलिवूडमध्येही यापूर्वी असे केले गेले होते पण बॉलिवूडमध्ये अनुरागचा हा उपक्रम कॊतुकाचा विषय ठरतो आहे. अनुराग कश्यपसमवेत वरुण ग्रोव्हरनेही त्याचा पुरस्काराचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुराग कश्यप का ट्वीट

अनुराग कश्यपने एका ट्वीटद्वारे याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘त्याच्या गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटासाठी मिळालेल्या सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर समीक्षक पुरस्काराच्या ट्रॉफीचा लिलाव करायचा आहे आणि सर्वाधिक बोली लावणाऱ्याला ही ट्रॉफी मिळणार आहे. एका महिन्यात १३,४४,००० रुपयांचा निधी गोळा करण्याचा त्याचा उद्देश आहे.

वरुण ग्रोवर का ट्वीट

 कोरोना टेस्टिंग किटची ही किंमत १.२ लाख + जीएसटी अशी आहे. सध्याच्या परिस्थितीत त्याचे लक्ष्य असे आहे की कमीतकमी ते ५ टेस्टिंग किट खरेदी करू शकतील, १०० लोकांची एका किटद्वारे चाचणी करता येईल. अशा परिस्थितीत त्यांनी दिलेल्या किटमधून किमान ५०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ही १ लाखांच्या पुढे गेली आहे तसेच ही संख्या सातत्याने वाढतच आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.