विराट कोहलीपासून दूर झाल्याने दु: खी झालेल्या अनुष्का शर्माने शेअर केले हे फोटो आणि म्हटले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची जोडी लोकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. दोघे बऱ्याचदा एकत्र सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतात जे खूप व्हायरल देखील होतात. पण अलीकडेच अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती त्याच्यापासून दूर असल्याने खूप दुःखी दिसत आहे. इतकेच नाही तर अनुष्काने त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की,आपल्याला असे वाटते की एखाद्याला निरोप देणे कालांतराने सुलभ होते, परंतु असे अजिबात होत नाही.


View this post on Instagram

????

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on Feb 15, 2020 at 2:02am PST

 

अनुष्का शर्माच्या या फोटोने सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगविली आहे, त्याचप्रमाणे लोकही या फोटोवर बरीच प्रतिक्रिया देत आहेत. अनुष्का आणि कोहली व्हायरल ब्लॅक अँड व्हाईट फोटो मध्ये खूपच क्यूट दिसत आहे.विराट कोहली आजकाल भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत अनुष्काने विराटसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच वेळी, यापूर्वी विराट कोहलीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनुष्का शर्मासोबत एक फोटो पोस्ट केला होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओंबद्दल चर्चेत असतात. २०१७ साली इटलीमध्ये या दोघांचे लग्न झाले. मात्र, अनुष्काबद्दल बोलायचे झाल्यास अनुष्का शर्मा अखेरची शाहरुख खानसमवेत ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. त्यांच्याशिवाय अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कामगिरी करू शकला नाही.


View this post on Instagram

 

You’d think good byes get easier with time. But they never do … ????

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on Feb 17, 2020 at 1:57am PST