औरंगाबाद प्रतिनिधी | शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या. हे वृत्त समजल्यानंतर सत्तारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर प्रयत्नशील होते. यावेळी अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा असल्याचे सांगत खोतकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सत्तार यांना भेटण्यासाठी ते हॉटेल अतिथीमध्ये गेले असता वेगळ्याच गोष्टी समोर आल्या. सकाळपासून केलेल्या धावपळीने माझं अर्धा किलो वजन कमी झालं असेल अशी मिश्कील टिप्पणीही त्यानी यावेळी मारतानाच सत्तार यांनी राजीनामा दिलाय ही अफवा असून याबाबतचा खुलासा ते लवकरच करतील असं खोतकर म्हणाले. सत्तार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी सकाळी भेट घेणार असल्याचंही खोतकर पुढे म्हणाले.
महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News