हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी सोमवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लागू झालेल्या आणीबाणीची मुदत मे अखेरपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीबद्दल तज्ज्ञांच्या मूल्यांकनाचा संदर्भ देताना अॅबे म्हणाले की, कोरोना विषाणूची लागण होणाच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाहीये आणि रूग्णालयात अजूनही क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण आहेत म्हणून सद्यस्तिथीत ही आणीबाणी सुरु राहिली पाहिजे.ते म्हणाले की मेच्या मध्यापर्यंतच्या आकडेवारीत सुधारणा झाली तर आपत्कालीन तरतुदींना थोडे शिथिल करता येईल.
यापूर्वी जपानचे आर्थिक व्यवहार मंत्री यासुतोशी निशिमुरा म्हणाले होते की कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस देशात आणीबाणी वाढविण्याच्या योजनेला तज्ञांनी पाठिंबा दर्शविला आहे.७ एप्रिल रोजी अॅबे यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली होती.सुरुवातीला याची अंमलबजावणी टोकियो व इतर सहा शहरी प्रांतांमध्ये करण्यात आली होती परंतु नंतर याची अंमलबजावणी हि देशभरात करण्यात आली आणि लोकांना सामाजिक हानी ८० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती करण्यात आली.
मात्र,पंतप्रधानांनी हा व्यवसाय थांबविण्याचा आदेश जारी करण्यास नकार दिला.जपानमध्ये आतापर्यंत कोविड -१९ च्या १५,००० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे आणि सुमारे ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानमधील कोरोना विषाणूची लागण होणारी एक तृतीयांश लोक एकट्या राष्ट्रीय राजधानी टोकियोमध्ये आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.