हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) गुरुवारी कोरोना व्हायरस जागतिक साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तानला सुमारे १.४ अब्ज डॉलर्सच्या आपत्कालीन मदतीस मान्यता दिली आहे.या आर्थिक मदतीमुळे पाकिस्तान आता या जागतिक महामारीच्या विरोधातील आपली लढाई आणखी चांगल्या पद्धतीने करू शकेल.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड -१९च्या या अत्यंत अनिश्चिततेच्या परिस्थितीत नजीकच्या काळात मोठा आर्थिक परिणाम होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे वित्तीय आणि बाह्य आर्थिक गरजा वाढतील. आयएमएफने पाकिस्तानला दिलेल्या ६ अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेज व्यतिरिक्त हि नवीन मदत आहे. गेल्या वर्षीच जुलैमध्ये पाकिस्तानला ६ अब्ज डॉलर्स कर्ज देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती.
आयएमएफचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक आणि प्रभारी अध्यक्ष जेफ्री ओकामोटो म्हणाले की कोरोना विषाणूच्या साथीचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर विनाशकारी परिणाम झाला आहे.जागतिक संकटासह देशांतर्गत परिस्थितीमुळे या देशाच्या विकास दरामध्ये अडथळा निर्माण झाला आहे.या संकटाच्या कठीण प्रसंगी,पाकिस्तान सरकारने व्हायरसच्या सामाजिक प्रसाराला आळा घालण्यासाठी वेगवान पावले उचलली आहेत आणि एक मदत पॅकेज देखील जाहीर केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.