मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याच प्रमाणे चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशाबद्दल उलट सुलट चर्चा देखील मागील काळात झाल्या आहेत. आज चित्रा वाघ यांना पत्रकारांनी तुम्ही राष्ट्रवादी का सोडली हा प्रश्न विचारताच रडू कोसळले आहे.
करमाळ्यात बँक ऑफ इंडियाचा स्लॅब कोसळला ; २४ लोक ढिगाखाली दबले
चित्रा वाघ यांनीही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला कि तुम्ही राष्ट्रवादी का सोडली. या प्रश्नाचे उत्तर देताना चित्रा वाघ यांना रडू कोसळले आहे. चित्रा वाघ यांनी अंतर्गत गटबाजीने राष्ट्रवादीत आपण मागील एक वर्षांपासून त्रस्त झालो होतो म्हणून आपण राष्ट्रवादी सोडली आहे असे विधान केले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून पाणी आले.
भाजप महाप्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे युतीबद्दल मोठे वक्तव्य
मागील २० वर्षांपासून मी राष्ट्रवादीचे काम करत होते. आता भाजपमध्ये आहे. नवऱ्यावर केस झाल्या म्हणून मी सरकारचा विरोध करायचे सोडले नाही. मी अधिक त्वेषाने विरोध करत राहिले. मात्र पक्षांतर्गत एक वर्षांपासून सुरु असणाऱ्या गटबाजीचा राजकारणामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
IPS साहेबराव पाटील यांचा भाजप प्रवेश ; मिळू शकते विधानसभेची उमेदवारी