हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. चार राज्यात निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. या ठिकाणी निवडणुकीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्यावर निशाणा साधला आहे. “विधानसभेची निवडणूक झालेल्या ५ पैकी चार राज्यात आधीही भाजपाच होती. महाराष्ट्रात शिवसेनेला ते कधीही शक्य होणार नाही कारण पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री आहेत, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “निवडणूक झालेल्या ५ पैकी चार राज्यात राज्यात आधीही भाजपाच होती आणि विरोधकांनी कितीही टीका केली तरी आताही भाजपाच येणार आहे. हे यश परफॉर्मन्सचे आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला ते कधीही शक्य होणार नाही कारण पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री आहेत.”
निवडणूक झालेल्या ५ पैकी चार राज्यात राज्यात आधीही भाजपाच होती आणि विरोधकांनी कितीही टीका केली तरी आताही भाजपाच येणार आहे. हे यश परफॉर्मन्सचे आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेला ते कधीही शक्य होणार नाही कारण पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री आहेत.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 10, 2022
पाचही राज्याच्या निवडणुकीचे निकाल लागले असून यापैकी चार राज्यात भाजपला बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीतील निकालानंतर महाराष्ट्रातील वातावरण मत्रमंत्र, चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांकडून महाराष्ट्रात आता महाविकास आघाडी सरकार पाडून भाजप सरकार स्थापन करण्याबाबत पुन्हा विधाने केली जात आहेत.