औरंगाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! कुख्यात गुंडाला कर्नाटकातून अटक

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – कुख्यात गुन्हेगार रुपेश उर्फ डोंगर शिवराम चव्हाण याने शेत वस्तीवर राहणाऱ्या एका कुटुंबावर हल्ला करीत त्यातील एकाचा खून (murder) केल्यानंतर फरार झाला होता. त्यास स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकांनी कर्नाटकातील कलबुर्गी शहरातून अटक केली आहे. याची अधिक माहिती निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिली.

काय आहे नेमके प्रकरण ?
02 जुलै 2021 रोजी रुपेश उर्फ डोंगरे याने त्याच्या साथीदाराच्या सहाय्याने वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील शेत वस्तीवर दरोडा टाकत एका मुलाचा खून (murder) केला. याचबरोबर महिलांवर ही प्राण घातक हल्ला (murder) केला होता. या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली होती. मात्र यातील मुख्य आरोपी हा फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी एक विशेष पथक तयार केले होते.

या विशेष पथकाने त्याचा अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद शहर या जिल्ह्यात त्याचा शोध घेतला होता. मात्र प्रत्येक वेळी तो आपली ओळख लपवत पळ काढत होता. शेवटी एलसीबीच्या पथकास रुपेश कर्नाटकातील कलबुर्गी शहरात मजुरी सह चोऱ्या करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत शनिवारी कलबुर्गी शहरातून त्यास अटक (murder) केली आणि औरंगाबाद येथे वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात (murder) आले. ही संपूर्ण कारवाई अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रेंगे, उपनिरीक्षक विजय जाधव हवालदार, श्रीमंत भालेराव वाल्मीक, निकम महेश बिरुटे वाल्मीक बनगे यांच्या पथकाकडून करण्यात आली.

हे पण वाचा :
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
SSC CGL अंतर्गत 20,000 जागांसाठी बंपर भरती
‘या’ multibagger stock ने फक्त 25,000 रुपयांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये