सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, शिवाय सोशल डिस्टन्ंिसगसह नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक यात्रा, जत्रा उरूसावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले. ज्या गावात यात्रा, ऊरुस भरणार आहे, त्या ठिकाणी नजर ठेवण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत 28 फेब्रुवारी 2021 रोजीच्या रात्री 12 पर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य शासनाकडील 14 नोव्हेंबर 2020 च्या आदेशान्वये व जिल्हाधिकारी कार्यालयाकडील 15 नोव्हेंबर 2020 च्या आदेशान्वये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व उपासना स्थळे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्यामुळे यात्रा, जत्रा, उरूस भरविण्यासाठी अर्ज प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, शिवाय सोशल डिस्टन्ंिसगसह नियमांचे पालन होत नसून दुसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धार्मिक यात्रा, जत्रा उरूसावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या गावामध्ये यात्रा, जत्रा आणि ऊरुस आहे, त्याठिकाणी धार्मिक विधी होणार आहे. त्या ठिकाणचे पर्यवेक्षण करून नियंत्रण ठेवावे, असे आदेश दिले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.