फसवणूक झाल्यानंतर यापुढे बँकांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही, फक्त फोन कॉल करून काही मिनिटांत सर्व पैसे परत मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ऑनलाईन फसवणूक (online fraud) वाढत आहे. कोरोनाच्या काळात (Corona time) ऑनलाइन फसवणूक करणार्‍यांचा चांगला फायदा झाला आणि लोकांना बळी पाडले. परंतु आता केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने एक विशेष क्रमांक जाहीर केला आहे. लोकांना ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी सरकारने हा नंबर जारी केला आहे. हा नंबर डायल केल्याच्या एक ते सात मिनिटांच्या आत, आपले सर्व पैसे आपल्या खात्यावर परत ट्रान्सफर केले जातील.

नंबर कोणता आहे ते जाणून घ्या
केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने 155260 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. आपले पैसे जे खाते किंवा आयडीवर ट्रान्सफर केले आहे, सरकारच्या 155260 या हेल्पलाईनवरून त्या बँकेला किंवा ई-साइटवर अलर्ट मेसेज पाठविला जाईल. मग आपली रक्कम होल्ड केली जाईल.

ही संपूर्ण प्रक्रिया कशी असेल ते जाणून घ्या
जर आपण फसवणूकीला बळी पडला असाल तर आपल्याला पहिले हेल्पलाइन नंबर 155260 डायल करावा लागेल. यानंतर आपले नाव, मोबाईल नंबर, फसवणूकीची वेळ, बँक खाते क्रमांक याविषयी प्राथमिक चौकशी म्हणून माहिती घेतली जाईल. यानंतर पुढील कारवाईसाठी हेल्पलाइन नंबर आपली माहिती पोर्टलवर पाठवेल. त्यानंतर संबंधित बँकेला या फसवणूकीबद्दल माहिती दिली जाईल. ती माहिती मिळाल्यावर फसवणूक झालेली रक्कम होल्ड केली जाईल. यानंतर, आपले पैसे आपल्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group