हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या खात्यातून पैसे चोरण्यासाठी फसवणूक करणारी लोकं बरेच मार्ग अवलंबत आहेत, ज्यामध्ये आपल्याला माहिती देखील नसते आणि आपली एक छोटीशी चूकही आपल्याला महागात पडते. हे फसवणूक करणारे लोक फसवणूक कॉलद्वारे लोकांना आपल्या फसवणूकीचे शिकार बनवित आहेत. या अशा प्रकारच्या कॉलला ‘व्हॉईस फिशिंग’ असे म्हणतात. हे लोक स्वतःची ओळख बँकेचे प्रतिनिधी किंवा बँकेचे टेक्निकल टीम म्हणून करतात. त्यानंतर, जेव्हा ग्राहकाची खात्री पटते तेव्हा ते त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिक माहिती घेतात. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की असे कॉल कसे ओळखावे आणि त्यांना कसे टाळावे…
सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की फसवणूक करणारे हे लोक सध्या बँक खात्यांमधून पैसे चोरण्यासाठी अनेक पद्धती वापरतात. यात एटीएम क्लोनिंग, व्हॉट्सअॅप कॉल, कार्ड डेटा चोरी, यूपीआयमार्फत चोरी, लॉटरीच्या नावावर फसवणूक, बँक खाती तपासण्याच्या नावाखाली फसवणूक असे प्रकार घडले आहेत.
वेळोवेळी बँक खाती तपासा
बर्याच प्रकरणांमध्ये असे कॉलर्स स्वत: ला प्रोफेशनल दाखवण्यासाठी बँकेचे प्रतिनिधी किंवा बँकेच्या टेक्निकल टीमचा भाग असल्याचे सांगत कॉल करतात. ग्राहकाची खात्री पटल्यानंतर हे फसवणुकदार त्यांच्याकडून खासगी माहिती आणि गोपनीय डेटा मिळवितो. सायबर सुरक्षा तज्ञ याबाबत म्हणतात की, आपण वेळोवेळी बँक खाती तपासली पाहिजेत आणि फसवणूक झालेल्या व्यवहाराबद्दल त्वरित आपल्या बँकेला माहिती द्यावी.
ही माहिती कोणाबरोबर शेअर करू नका
फसवणूक कॉल करणारी व्यक्ती बर्याचदा वन टाइम पासवर्ड (ओटीपी), सुरक्षित पासवर्ड, क्रेडिट / डेबिट कार्ड नंबर, कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक, एक्स्पायरी डेट, एटीएम पिन, इंटरनेट बँकिंग लॉगिन आयडी, पासवर्ड आणि इतर वैयक्तिक माहिती विचारतात. ग्राहकाने कधीही अशी कोणतीही माहिती फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर कोणालाही शेअर करू नये. जर आपण कॉलवर ही माहिती दिली असेल तर लगेचच बँकेला कळवा आणि तुमचा पासवर्ड त्वरित बदला.
बँक कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही
बँका ग्राहकांना कॉल करीत नाहीत आणि कोणतीही वैयक्तिक माहिती, पासवर्ड किंवा वन टाइम पासवर्ड (ओटीपी) विचारत नाहीत. तसेच ग्राहकास युझर आयडी, पासवर्ड , डेबिट कार्ड क्रमांक, पिन, सीव्हीव्ही इत्यादी अपडेट किंवा व्हेरिफाय करण्यास सांगितले जात नाही. नेहमी लक्षात ठेवा की पासवर्ड, PIN, TIN इत्यादी काही माहिती काटेकोरपणे गोपनीय असतात तसेच ती बँकेचे कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी त्यांनाही माहित नसतात.
खात्यातून पैसे चोरी करण्याचेही मार्ग आहेतः
कार्ड डेटा चोरी
एटीएम कार्ड क्लोनिंग
बँक खाती तपासण्याच्या नावाखाली फसवणूक
नोकरीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक
लग्नाच्या वेबसाइटवर लोकांसह फसवणूक
व्हाट्सएप कॉलद्वारे फसवणूक
यूपीआयमार्फत फसवणूक
क्यूआर कोड फसवणूक
पेट्रोल पंप डीलरशिपच्या नावावर लॉटरी, ऑनलाईन फसवणूक
ई-मेल स्पूफिंग
रिवॉर्ड पॉइंटच्या नावाने फसवणूक
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.