शेतकऱ्यांसाठी मोठा इशारा! उद्या किसान क्रेडिट कार्डची रक्कम जमा करा अन्यथा …!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी कोरोनाव्हायरस संकटात खूप उपयुक्त ठरत आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन आणि कृषी विकास दराला गती देण्यास हे मदत करीत आहे. यावेळी देशातील 8 कोटी पेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. बँकेकडून घेतलेले शेत कर्ज परतफेड करण्याची तारीख लक्षात ठेवा, अन्यथा ही चूक तुमच्या खिशाला महागात पडेल. जर तुम्ही वेळेवर कर्ज दिले नाही तर तुम्हाला 4 ऐवजी 7 टक्के व्याज द्यावे लागेल. त्याची अंतिम मुदत ही दोन दिवसांनंतर 31 ऑगस्ट रोजी आहे.

KCC संदर्भात सरकारने ही घोषणा केली
आता KCC अंतर्गत शेतकऱ्यांकडून कोणतीही हमी न घेता 1.60 लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर्वी ही मर्यादा फक्त 1 लाख रुपये असायची. सावकारांच्या तावडीत, शेतकऱ्यांनी अडकू नये म्हणून सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत आहे. अर्ज सादर केल्याच्या 15 दिवसांच्या आत बँकांना KCC जारी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कार्ड बनविण्याकरिता लागणारा प्रोसेसिंग चार्जही रद्द केला गेलेला आहे.

लॉकडाऊन पाहता मोदी सरकारने कर्ज परत करण्याची मुदत 31 मार्च ते 31 मे पर्यंत वाढविली. नंतर ती 31 ऑगस्ट करण्यात आली. याचा अर्थ असा की, शेतकरी 31 ऑगस्ट पर्यंत दर वर्षी मिळणाऱ्या केवळ 4 टक्के जुन्या दराने केसीसी कार्डचे व्याज देऊ शकतात. नंतर ते तीन टक्क्यांनी महाग होईल.

31 ऑगस्टपर्यंत किसान क्रेडिट कार्ड भरणे का महत्वाचे आहे
KCC वर घेतलेले कर्ज सहसा 31 मार्चपर्यंत परत करावे लागते. मात्र, कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी देशात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ते आणखी वाढविण्यात आले. आता कर्ज पेमेंट करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. ज्या शेतकऱ्यांना वेळेवर पैसे जमा करायचे आहेत ते व्याज सूटचा फायदा घेऊ शकतात. दोन-चार दिवसांनंतर पुन्हा पैसे काढा. अशा प्रकारे तुमचे बँकेमधील रेकॉर्डही चांगले राहील आणि शेतीसाठी पैशांची कमतरताही भासणार नाही.

किसान क्रेडिट कार्डवर किती व्याज द्यायचे ?
शेती आणि शेतीसाठी KCC वर घेतलेल्या तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा व्याज दर हा 9 टक्के आहे. पण त्यात सरकार दोन टक्के अनुदान देते. अशा प्रकारे तो 7 टक्क्यांपर्यंत खाली येतो. पण वेळेवर परत केल्यावर तुम्हाला 3% अधिक सूट मिळेल. अशा प्रकारे जागरूक शेतकऱ्यांसाठी त्याचा दर फक्त 4 टक्के आहे. बँका सहसा शेतकऱ्यांना याची माहिती देतात आणि 31 मार्चपर्यंत कर्ज परत करण्यास सांगतात. तोपर्यंत जर आपण बँकेत पैसे भरले नाही तर 7 टक्के व्याज द्यावे लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment