आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला आहे. त्यामुळे आता आज पासून अनेक व्यवहारांच्या नियमांत महत्वाचे बदल झाले असून या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या खिशावर पडणार आहे. आजपासून SBI, बँकिंग, ATM, PNB, रेल्वे सेवांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत.

पीएनबी ग्राहकांसाठी बदलः अनेकदा ऑनलाईन पेमेंट सर्व्हिस वापरणार्‍या पंजाब नॅशनल बँकेत खाते असलेल्यांसाठी एक मोठा बदल झाला आहे. ३० एप्रिलपर्यंत चालू असलेल्या पेमेंट वॉलेट सर्व्हिस पीएनबी किट्टी वॉलेटसह पीएनबीने १ मेपासून आपले डिजिटल वॉलेट बंद केले आहे. बँकेने डिसेंबर २०१६ मध्ये ही सेवा सुरू केली होती.

PNB to close this service, withdraw your money before April 30 ...

स्टेट बँक खातेधारकांसाठी बातमी – एसबीआयमध्येही आजपासून महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत. या बँकेचा व्याज दर आता बदलणार आहे. १ मेपासून बँक एक लाखाहून अधिक बचत खात्यांवरील व्याज दर कमी करीत आहे. त्याचबरोबर आता बँकेकडून नव्या कर्जदारांना पूर्वीपेक्षा कमी दराने कर्ज दिले जाईल. एक्‍सटर्नल बेंचमार्क नियमांची अंमलबजावणी करून एसबीआयने रेपो दरात बचत ठेव आणि अल्प मुदतीच्या कर्जाचे दर लागू केले आहेत.  आरबीआयने रेपो दर बदलल्यानंतर एसबीआयनेही त्यांत बदल केले आहेत.

रेल्वे नियम – सध्या रेल्वे आणि हवाई सेवांचे कामकाज बंद आहे. परंतु या सेवा सुरू होताच नवीन नियमांची अंमलबजावणी सुरु होईल. १ मे पासून, रेल्वेमध्ये प्रवास करणारे प्रवासी रिजर्वेशन चार्ट सुटण्यापूर्वी ४ तासांपर्यंत बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करू शकतात. सध्या, रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासी प्रवासाच्या तारखेच्या २४ तास आधी त्यांचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकत होते. परंतु आता ते ४ तासांपूर्वीही केले जाऊ शकते.

Indian Railways From 1850 | Complete history in 3 minutes or less ...

एटीएमशी संबंधितही नियमही बदलतील – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ATM संदर्भात एक नवीन नियम समोर आला आहे. वारंवार मशीन वापरुन त्यामुळे होणा-या संसर्गाचा धोका दूर करण्यासाठी प्रत्येक एटीएम उपयोगानंतर संसर्गमुक्त होण्यासाठी स्वच्छ केले जातील. हा नियम यूपीमधील गाझियाबाद आणि चेन्नई येथे सुरू झाला आहे आणि लवकरच इतर ठिकाणीही याची अंमलबजावणी सुरु होईल. जर हा नियम पाळला नाही तर एटीएम चेंबर सीलबंद होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.