एलन मस्कच्या ट्विटने बिटकॉइनला बसला धक्का, Dogecoin च्या किंमती वाढू लागल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा मालक एलन मस्क पुन्हा एकदा आपल्या ट्विटसंदर्भात चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या ट्विटने क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनचे नुकसान झाले आहे तर इतर क्रिप्टोकरन्सी डॉजकॉईनला फायदा झाला आहे.

मस्कची कंपनी SpaceX च्या Dogecoin द्वारे पेमेंटची घोषणा आणि टेस्लाची बिटकॉईन मार्फत पेमेंट बंद करण्याची घोषणा केल्यांनतर Dogecoin ची किंमत अस्थिर होते आहे. गेल्या आठवड्यात मस्कने एका कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर Dogecoin ची किंमत वाढली होती, परंतु त्यानंतर मस्कने एक ट्वीट केले जे एका मीमपासून सुरु झालेल्या या क्रिप्टोकरन्सीला “घाई गडबड” असे म्हंटले, ज्यामुळे त्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली.

Dogecoin च्या डेवलपर्ससह काम करून सिस्टम व्यवहारांची कार्यक्षमता सुधारली
Dogecoin च्या किंमतीत वाढ आणि घसरण्यामागे मस्कचे ट्वीट एक मोठे कारण आहे. शुक्रवारी मस्कने केलेल्या ट्विटनंतर Dogecoin च्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले, “Dogecoin च्या डेवलपर्ससह काम करून सिस्टम व्यवहाराची कार्यक्षमता सुधारली जात आहे. हे संभाव्यता दर्शवते.”

मस्कने दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,”घाबरू नका”
यापूर्वीही मस्कने ट्विटरवर केलेल्या कमेंट्समुळे शेअर बाजारामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मस्कने दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,” घाबरू नका.” मात्र लोकं याकडे एक विनोद म्हणून पाहत आहेत, परंतु मस्कच्या मागील ट्विट्सकडे पाहिले तर हे ट्विट मागे नक्की काय आहे हे जाणून घेणे कठिण आहे.

Dogecoin ची किंमत 18% वाढली
ट्रेडिंग व्ह्यूच्या मते, मस्कच्या ट्वीटनंतर, Dogecoin ची किंमत 18% वाढली होती आणि त्याची मार्केट कॅप 10 अब्ज डॉलर्सने वाढले. मस्कने बुधवारी जाहीर केले की ,”टेस्ला यापुढे त्यांच्या कारच्या पेमेंटसाठी बिटकॉइन्स घेणार नाही. तथापि, त्याची आणखी एका कंपनी स्पेसएक्सने Dogecoin मध्ये पैसे घेण्यास सहमती दर्शविली आहे.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment