“पवार साहेब तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी लवासा बांधली तर मोदीजींनी जनतेसाठी…”; भाजपची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यात विविध विकास कामाचे उदघाटन करण्यात आले. यामध्ये त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन केले. पंतप्रधानांच्या या कार्यक्र्मावरून भाजपने शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “पवार साहेब, तुम्ही 15 वर्षात 11 किलोमीटर मेट्रोचे नेटवर्क उभं केलं. माननीय नरेंद्र मोदी यांनी 5 वर्षात 233 किलोमीटरचे नेटवर्क उभे केले, अशी टीका भाजपने केली आहे.

आज भाजपचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथे विविध विकास कामांचे उद्धघाटन केले. त्यांच्या या कार्यक्रमावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही टीका केली. त्यावरून आज भाजपने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, पवार साहेब, तुम्ही 15 वर्षात 11 किलोमीटर मेट्रोचे नेटवर्क उभं केलं. माननीय नरेंद्र मोदी यांनी 5 वर्षात 233 किलोमीटरचे नेटवर्क उभे केले. तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी लवासा बांधली. तर, मोदीजींनी जनतेसाठी मेट्रो, महामार्ग बांधले, असे ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान भाजपच्या वतीने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुणे विकासातील विकास कामांची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये फडणवीस यांच्याकडून पुण्यातील अनेक विकास कामाची माहिती दिली जात आहे.