मुंबई । छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीदेखील आक्षेप घेत ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, असं जाहीर केलं अखेर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटसंबंधी माफी मागितली आहे. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या ट्विटनंतर लगेचच माफी मागत ट्विट करत म्हटलं आहे की, “छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो”.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2020
ट्विट, टीका आणि माफी
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन केलं होतं. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. त्याचबरोबर अनेकांनी माफीची मागणीही केली. या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर काही वेळातच संभाजीराजेंनी एक ट्विट केलं. ज्यात फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संपूर्ण प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत,” असं छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं होतं.
माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 7, 2020
‘त्या’ ट्विटमुळं काँग्रेसने डागली फडणवीसांवर तोफ
देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती शाहू महाराजांविषयीच्या ट्विटवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. “संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखन आश्चर्यकारक नाही. संघानं मनुवाद आणायचा असल्यानं महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकस केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!,” असं ट्विट करत सावंत यांनी टीका केली होती.
संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखणे आश्चर्यकारक नाही. संघाने मनुवाद आणायचा असल्याने महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकसच केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध! pic.twitter.com/hDE1evgFBR
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 6, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”