आम्ही ठाकरे सरकारचं विसर्जन करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्ष व त्यांतील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. आज त्यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “महाराष्ट्रामध्ये एक वेगळेच चित्र आहे. गणेश विसर्जन, मुंबईत विसर्जनाच्या दिवशी सगळी रस्त्यावर अस्ताना माझ्या घरी पोलीस आले. घोटाळे त्यांनी करायचे आणि जेलमध्ये आम्हाला पाठवता. इतिहासात हा पहिला दिवस असेल ठाकरे सरकारचा विसर्जनचा ड्रामा आहे. गणेश विसर्जन तर व्यवस्थित झाले पण ठाकरे सरकारचे विसर्जन आम्ही करणार आहोत, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज क्रांतीला सुरुवात झालेली आहे. जितेंद्र आव्हाड गेले आता अनिल देशमुखांनी कपडे भरायचे आहे. अनिल परब, किशोरी पेडणेकर, अजित पवार यांची लाईनच लागली आहे. राज्यात जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत. त्यातील शरद पवार, अजित पवारांसह सर्व पवारांनी लुटलेल्या कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. ती अजून संपलेली नाही.

पवारांनी आतापर्यंत जेवढे कारखाने लुटले आहेत. जेवढे घोटाळे केले आहेत. त्या या घोटाळ्याचा आम्ही दहावा आणि बारावा पण घालणार आहोत. पवारांची 1 लाख कोटीची बेईमानी संपत्ती आहे. त्याचीही माहिती त्यांनी दिली पाहिजे, असेही सोमय्या यांनी यावेळी म्हंटले आहे.

Leave a Comment